लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी, दि. १३ मार्च : अहेरी येथील वॉर्ड क्र. १५ मध्ये एका युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आज सकाळच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे. मृत युवकाचे नाव शंकर निरंजन विश्वास (२८) असे असून त्याचे मूळ गाव सुंदरनगर आहे. मृतक हा मेकॅनिक चे काम करत होता अशी माहिती आहे.
नेमके कोणत्या कारणांमुळे त्याने गळफास लावला हे अद्याप कळू शकले नाही.
अहेरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचुंन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास अहेरी पोलीस चे उपनिरीक्षक जिजा घुट्टे ह्या करीत आहे.
हे देखील वाचा :
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पार पडला भव्य आदिवासी सामुहीक विवाह सोहळा