लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. तर लगेचच दोन दिवसांनी निकाल जाहीर होणार आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला मोठा झटका दिला आहे. निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असे निर्देश अजित पवार गटाला देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाप्रकरणी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो वापरु नका, असे निर्देश दिले आहे. तसचे विधानसभेत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असेही आदेश अजित पवार गटाला दिले आहेत.