धक्कादायक घटना – प्रवासी भरलेली टाटा मॅजिक गाडी नाल्याला आलेल्या पुरात गेली वाहून !

टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात हलगर्जीपणाने घातली गाडी. या गाडीत होते एकूण 5 लोक, वरोरा तालुक्यातील धक्कादायक घटना,...
लोकस्पर्ष न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर दि, ९ जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात प्रवासी वाहतूक करणारी टाटा मॅजिक गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्यावरील पुलारून पुराचे पाणी जात असतानाही वाहन चालकाने अतिशय निष्काळजी पणें प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता पुलावरून गाडी घातली. परंतु पाण्याचा वेग इतका होता की, ५ प्रवाशांसह गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. या घटनेचा थरार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.

जिल्ह्यात विविध तालुक्यात दिवसभर कमी-अधिक मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्यावरील पुलारून पुराचे पाणी जात असतानाही सदर चालकाने ही गाडी पाण्यातून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रवाह इतका होता की, पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली .

गाडी वाहून जात असल्याचे प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या टपाचा आधार घेतला. माहिती मिळताच गावातील नागरिकांसह भारतीय सैन्यात असलेल्या आणि सुटीवर गावात आलेल्या निखिल काळे या जवानाने घटनास्थळी धाव घेत भर पावसात बचावकार्य केले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे निखिल काळे या सैनिकाने प्रसंगावधान राखून केलेल्या बचावकार्याचे कौतुक केले जात आहे.

हे देखील वाचा,

 

 

दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित चांगले उपचार द्या; मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू!

Clead newsdm chandraprsp chandrapur