लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर ,दि,11 जुलै : नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा च्या भीमनगर इसासनी नाल्यावर आलेल्या रात्रीच्या पुरात आई आणि मुलगी वाहून गेली आहे . सुकवन राधेलाल मातरे (४२) आणि त्यांची (१७) वर्षीय मुलगी अंजली राधेलाल मातरे असे वाहुन गेलेल्यांचे नावं आहेत. यापैकी सुकवन यांचा मृतदेह घराच्या काही अंतरावर आढळून आला आहे तर त्यांची मुलगी अंजलीचा शोध घेतला जातो आहे.
काल दिवसभर आणि रात्री नागपूरसह संपूर्ण जिल्हात दमदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे तर काहींना पूर आलेला आहे. हिंगणा येथील भीमनगर इसासनीच्या नाल्याचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. त्याच वेळी सुकवन आणि त्यांची मुलगी अंजली हे घराबाहेर पडले असता तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या असाव्यात असा कयास लावला जात आहे.
मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी सुकवन राधेलाल मातरे यांचा मृतदेह घरापासून काही अंतर दूर पडलेला दिसून आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना समजताच हिंगणा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अंजलीला शोध घेतला जातो आहे.
हे देखील वाचा,
मुंबई – गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार तलावात बुडाली.
VIDEO: वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली.