लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बुलढाणा, दि. ३ मार्च : हिंदु-मुस्लीमांच्या एकतेचे प्रतिक असलेली बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव सराई येथे दरवर्षी भरणारी सैलानी बाबांची यात्रा सलग तिसऱ्या वर्षी ही रद्द करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून तथा साथरोग प्रतिबंधक कायदा तथा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत जिल्हाप्रशासनाने या यात्रेस स्थगिती दिली आहे. या यात्रेत राज्यासह देशभरातून जवळपास पाच ते सहा लाख भाविक येत असतात यात्रा सुरू ठेवल्यास कोरोनाची बाधा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे हा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
ओबीसी आरक्षणावर मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला; महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का
अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत