आरोग्य कर्मचाऱ्यांनी काढली तीन परिचारिकांची छेड

भामरागड ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली:  भामरागड ग्रामीण रुग्णालयातील नव्याने भरती झालेल्या परिचारिकांना प्रशिक्षणार्थी म्हणून विविध आरोग्य केंद्रांत पाठविण्यात आलेले आहे. त्यानुसार भामरागड ग्रामीण रुग्णालयात पाठविलेल्या तीन प्रशिक्षणार्थी परिचारिकांची सहकारी कर्मचाऱ्यांकडूनच छेड काढण्यात आल्याची  धक्कादायक घटना दि. १३ नोव्हेंबरला उजेडात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भामरागड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या तीन परिचारिकांसोबत घडलेल्या  किळसवान्या  प्रकाराने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. सदर घटनेची तक्रार  ग्रामीण रुग्णालयातील महिला तक्रार निवारण समिती व वैद्यकीय अधीक्षकांकडे परिचारिकांनी  केली.  त्यानंतर त्यांनी गंभीर घटनेची    दखल घेत तिघांनाही ग्रामीण रुग्णालयातून तात्काळ कार्यमुक्त करून जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेकडे पाठवले आहे. यासंदर्भात कार्यालयीन तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करून अहवाल मागवला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. माधुरी किलनाके यांनी  भामरागड येथील घटनेची गंभीर दखल घेतलेली असून या तिघांवर काय कारवाई होते, याकडे आरोग्य वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.