लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमरावती, दि.2 जुलै : अमरावतीत 21 जून रोजी उमेश कोल्हे या मेडिकल व्यावसायिकाची गळा कापून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचे आता उदयपूर येथील कन्हैया टेलर च्या हत्येशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी तपासासाठी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे पथक अमरावतीत दाखल झाले आहे.
प्रथमदर्शनी, ही हत्या कोल्हे यांना लुटण्याच्या उद्देशाने केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता.परंतु हल्लेखोरांनी उमेश कोल्हे यांच्याकडील 35,000 रुपयांना हात लावला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढलेला. तसचं उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही हत्या देखील उदयपूर येथील कन्हैया टेलरची ज्या प्रमाणे हत्या करून कट्टर पंथी हल्लेखोरांनी व्हिडिओ तयार करून नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्यांविरोधात धमकावले होते.
उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची देखील यावेळी एनआयएच्या पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. या हत्यामागे नुपूर शर्मा यांच्याशी संबंधित वाद असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर त्यांची हत्या झाली. त्यामुळे आता या प्रकरणाचा या हत्येशी काही संबंध आहे का याचा तपास यंत्रणांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी आता आणखी कोणता खुलासा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा :