दिपकदादा आत्राम यांच्याहस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १३ मार्च : गोंडवाना गोंड समाज संघटना जिल्हा गोंदिया शाखा सडक अर्जुनी अंतर्गत ग्रामशाखा मुंडीपार तर्फे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके व वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.

अहेरी विधान सभेचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रांतिवीर वीर बाबुराव सडमेक व वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांच्या जीवन चरित्रावर संपूर्ण मार्गदर्शन केले आहे.

यावेळी सहउदघाटक म्हणून आदीवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे, गोगोससचे जिल्हाध्यक्ष भारत मडावी, कचारगड ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, शरीष उईके, राधेशाम टेकाम, प्रकाश वट्टी, विष्णू अंबुरे, शोभिलात उईके,विजय कुसनाके माजी सरपंच,जुलेख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून समाज प्रबोधन केले.

 हे देखील वाचा : 

पोलीस नक्षल चकमकीत एक नक्षली जखमी

पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पार पडला भव्य आदिवासी सामुहीक विवाह सोहळा

धक्कादायक! गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह…

 

lead news