दारूविक्री बंद करण्यासाठी महिला एकवटल्या…

विक्रेत्यास गावाबाहेर काढण्याचा निर्णय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २५ जानेवारी : देसाईगंज नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या नैनपूर वार्डातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी महिला एकवटल्या आहेत. दारूबंदी वार्ड समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करून दारू विक्री बंद न करणाऱ्यास गावाबाहेर काढण्याचा कठोर निर्णय सुद्धा घेण्यात आला.

नैनपूर येथे मागील २० वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद होती. वॉर्डात नव्याने दारूविक्री सुरु करणाऱ्यास दारूबंदी वॉर्ड समितीच्या महिलांनी अवैध व्यवसाय बंद करण्याची सूचना दिली. मात्र, मुजोर दारूविक्रेत्यानी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे दारूबंदी वॉर्ड समितीच्या नेतृत्वात शेकडो महिलांच्या उपस्थिती बैठकीचे आयोजन करून दारूमुक्त वार्ड निर्माण करण्यासाठी विविध ठराव घेण्यात आले.

वॉर्डातील दारूबंद करणे, दारू विक्रेत्यांवर दंड आकारणे, दंड न भरल्यास त्या किंमतीची वस्तू जप्त करणे, वॉर्डातील दारू पिणाऱ्यांवर दंड आकारणे, विक्री बंद न केल्यास घर सील करून गावाबाहेर काढणे, गोकुळनगर येथील अवैध दारूविक्री बंद करणे आदी ठराव महिलांनी एकमताने घेण्यात आले. सोबतच दारू विक्री बंद करण्यासाठी पोलिस विभागाने सहकार्य करण्याची मागणी सुद्धा महिलांनी केली आहे.

यावेळी देसाईगंज नप च्या माजी नगराध्यक्षा शालू दंडवते, नगरसेविका करुणा रामटेके, तालुका कृषी व्यवस्थापक ठाकरे, वॉर्ड समितीच्या अध्यक्ष छाया कुथे, मुक्तिपथ तालुका संघटक भारती उपाध्ये, अनुप नंदगिरवार, शोभा चांदेकर, साक्षी चांदेवार, प्रतीक्षा चांदेवार, विद्या टिकले, रीना बारसागडे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

हे देखील वाचा : 

सात अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तर एक पोलीस अंमलदार यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

गोंडवाना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. श्रीराम कावळे

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

lead news