जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव

या स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहमदाबाद डेस्क 24 फेब्रुवारी:- जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लड 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी मोटेरा स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे.  राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे उद्घाटन केले. उद्घाटनासह, मोटेरा स्टेडियमचे नाव बदलण्यात आलं असून आता नरेंद्र मोदी असं नामकरण करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमित शाह या सोहळ्यासाठी खास उपस्थित होते. 

या उद्घाटन सोहळ्याला अमित शाह यांच्यासह गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. अमित शाह यांनी म्हटलं की, आज खेळ जगतासाठी सुवर्ण दिन आहे. आज भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते भारतरत्न सरदार पटेल यांच्या नावे मोठ्या स्पोर्ट्स कॉम्लेक्सचं भूमीपूजन करण्यात आलं आहे.

सरदार पटेल स्पोर्ट्स कॉम्लेक्समध्ये जगातील सर्व खेळांची व्यवस्था असणार आहे. देशातील आणि जगातील सर्व खेळाडूंच्या ट्रेनिंग आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे. याठिकाणी 3000 मुलांची एकाचवेळी खेळण्याची आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे,

या स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स, ऑलिम्पिक-स्तरीय जलतरण तलाव, इनडोअर अॅकॅडमी, अॅथलिट्ससाठी चार ड्रेसिंग रूम आणि फूड कोर्ट आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना आजपासून या मैदानात खेळवला जाणार आहे. पिंक बॉलनं डे-नाइट हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने या मैदानात खेळवले जाणार आहेत. 

Motera-Stadium-in-Ahmedabadname changenarendramodi studum