लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
Champions Trophy 2025 : गेल्या काही दिवसांपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये कोणाचा समावेश होणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माकडे कर्णधार पद कायम ठेवण्यात आले असून युवा खेळाडू शुभमन गिलकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
19 फेब्रुवारीपासून होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाहीर झाली आहे. मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर ही टीम जाहीर करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. अव्वल 8 टीममध्ये ही स्पर्धा होणार असून भारतीय टीम स्पर्धेतील सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून रोहित शर्मावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं वन-डे वर्ल्ड कप 2023 मध्ये फायनलपर्यंत धडक मारली होती. तर मागच्या वर्षी झालेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं होतं. अनुभवी खेळाडू मोहम्मद शमी पुन्हा एकदा संघात परतत असून त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच गेल्या काही काळापासून जसप्रीत बूमरहाचादेखील या संघात समावेश असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचं वेळापत्रक
भारत विरुद्ध बांगलादेश – 20 फ्रेब्रुवारी – दुबई
भारत विरुद्ध पाकिस्तान – 23 फेब्रुवारी – दुबई
भारत विरुद्ध न्यूझीलंड – 2 मार्च – दुबई