हैदराबादची बंगलोरवर 6 विकेट्सनी मात, कोहलीचा RCB संघ IPL मधून बाहेर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

अबुधाबी : आयपीएल 2020 मधील एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला. शुक्रवारी अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अबुधाबी येथे 6 गडी राखून हैदराबादने पराभव केला. बंगळुरूला १३१ धावांवर रोखण्यात हैदराबादला यश आलं. हैदराबादने 4 विकेट गमावून लक्ष्य गाठलं. केन विल्यमसनने (नाबाद 50) आणि जेसन होल्डर (नाबाद 24) यांनी संघाला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत जाण्यासाठी सनरायझर्स आता क्वालिफायर -२ मध्ये दिल्लीसोबत खेळतील. सनरायझर्सचा हा सलग चौथा विजय होता. या विजयासह हैदराबाद आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळणार आहे. तर बंगलोरचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.

हैदराबादकडून केन विल्यम्सनने 44 चेंडूत 50 धावांची खेळी केली. मनिष पांडेने 24, जेसन होल्डरने 24 आणि डेविड वॉर्नरने 17 धावा केल्या. बंगलोरकडून मोहम्मद सिराजने दोन, तर एडम जम्पा आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचे फलंदाज अपयश ठरले. कोणालाच काही खास कामगिरी करता आली नाही. कर्णधार कोहली 6 रनवर आऊट झाला. एबी डिव्हिलियर्सने अर्धशतक झळकावले. पण संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. एबीने आयपीएल कारकिर्दीतील आपले 41 वे अर्धशतक झळकावले. डीव्हिलियर्स टी-नटराजनच्या अचूक यॉर्करचा बळी ठरला. 43 बॉलमध्ये त्याने 56 धावा केल्या. हैदराबादकडून जेसन होल्डनने शानदार गोलंदाजी केली आणि 3 विकेट घेतल्या. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमवून फक्त 131 रन केले. हैदराबादच्या संघाने बंगळुरुवर विजय मिळवला.

Virat Kohli