आयपीएलच्या मैदानात कोरोनाची एण्ट्री, क्रिकेटपटूला कोरोना

आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 03 मे :- आयपीएलच्या 14 व्या पर्वावर (IPL 2021) कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. कोलकाता आणि आयपीएलच्या अधिकृत निवेदनाची अद्यापपर्यंत कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाहीय. दरम्यान आज आयपीएलची कोणतही मॅच खेळवली जाणार नाही.

कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलची 30 मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सांमना पुढे ढकलण्यात आला आहे.

आयपीएल 2021 सुरू झाल्यानंतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी काही खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ऑस्ट्रेलियन वेबसाइट द एजच्या रिपोर्टनुसार कोलकाता नाइट रायडर्सचे बरेच खेळाडू आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित खेळाडू आणि कर्मचारी आयसोलेट आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडलेल्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचे नावही आहे.

covidIPLKKRlockdownmatch postondsandip wariervarun chatravarthi