लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
T20 World Cup 2022 :- टी 20 वर्ल्ड कप विश्वचषकाला सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या महत्त्वाच्या आणि मोठ्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज शान मसूद याला दुखापत झाली आहे. पाकिस्तानच्या नेट सरावादरम्यान त्यांचा स्टार फलंदाज शान मसूद जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा फलंदाज शान मसूदला सराव सत्रादरम्यान डोक्यावरच चेंडूचा मार बसला. पाकिस्तान संघ मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये सराव करत असतानाच मोहम्मद नवाज गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर शानचा फलंदाजीचा सराव सुरु होता.
सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच एकाएकी एक चेंडू त्याच्या डोक्यावरच आदळला. ज्यानंतर मसूद मैदानाच पडला. शान मसूदला हा फटका बसल्यानंतर तिथं असणाऱ्या पाकिस्तान टीम च्या खेळाडूंचा काळजाचा ठोका चुकला. मोहम्मद नवाजच्या पायाखालची जमीन सरकली. खेळाडूंनी तातडीनं आपल्या साथीदाराला सांभाळून घेतलं आणि तातडीनं त्याला रुग्णालयात नेलं.
हे देखील वाचा :-