लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
T20 World Cup 2022 22, ऑक्टोबर :- टी-20 विश्वचषकातील सुपर-12 च्या फेरीची सुरुवात गतविजेते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याने होणार आहे. आसीसीच्या मोठ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आपल्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी उतरेल. टी-20 विश्वचषकाच्या आतापर्यंत सात आवृत्त्या खेळल्या गेल्या आहेत. ज्यात वेस्ट इंडीज हा एकमेव संघ आहे, ज्यानं सर्वाधिक दोन वेळा टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. तर, भारत, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियानं प्रत्येकी एकदा टी-20 विश्वचषक जिंकलाय.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सुपर-12 मधील पहिला सामना शनिवारी 22 ऑक्टोबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 12.30 वा. सुरू होईल. तर, अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकतात. तसेच टी-20 विश्वचषकाच्या संबंधित ताज्या बातम्या वाचण्यासाठी तुम्ही एबीपी माझावर वेबसाईटवर भेट देऊ शकतात. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा :-