T20 World Cup 2022:- दोन वेळचा चॅम्पियन संघ स्पर्धेतून बाहेर

वेस्ट इंडिज यंदा पात्रता फेरीत आयर्लंड संघाने त्यांना 9 विकेट्सने मात देत स्पर्धेबाहेर केलं आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

T20 World Cup 2022 21 ऑक्टोबर :-  गेल्या 16 ऑक्टोंबरपासून वर्ल्ड कपला  सुरूवात होताच धक्कादायक निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. अनपेक्षित असे संघ सामन्यात विजय मिळवून आपली विजयाची दावेदारी पेश करतायत.असाच एक धक्कादायक निकाल आता समोर आला आहे. स्पर्धेत मोठे उलटफेर होताना दिसत आहेत.

नुकत्याच झालेल्या ग्रुप B मधील सुपर 12 साठी पात्रता फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने आयर्लंडवर 9 विकेट्स राखून विजय मिळवला. ज्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ दोन पराभवांसह स्पर्धेबाहेर झाला आहे. विशेष म्हणजे 2010 आणि 2012 विश्वचषक विजेता वेस्ट इंडिज यंदा सुपर 12 मध्येही एन्ट्री मिळवू न शकल्याने स्पर्धेत एक मोठा उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे. सामन्यात आधी फलंदाजी करत वेस्ट इंडिजने 146 धावा केल्या ज्याचा पाठलाग करताना आयर्लंडने केवळ एक गडी गमावत 17.3 षटकांत 150 धावा केल्या. अनुभवी पॉल स्टर्लिंग याने नाबाद 66 तर लॉर्कन टकरने नाबाद 45 धावांची दमदार भागिदारी यावेळी केली. यासोबतच आयर्लंडचा संघ सुपर 12 मध्ये दाखल झाला आहे.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सध्या क्वालिफाय सामने सुरू आहेत. या क्वालिफाय सामन्यात धक्कादायक निकाल हाती येत आहेत. त्यात आता सुपर 12 सामन्यापुर्वीच एक दिग्गज संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना मोठा झटका बसला आहे.

हे पण वाचा :-

T20 WCT20 world cupwest indiesWI Vs IRE