केंद्रस्तरीय बालक्रीडा तथा सांस्कृतिक महोत्सवात ताटीगुडम शाळा ठरली चॅम्पियन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  अहेरी तालुक्यातील राजाराम केंद्रांतर्गत पार पडलेल्या दोन दिवशीय केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा तथा संस्कृतीक स्पर्धा महोत्सवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ताटीगुडम शाळेने अनेक वैयक्तिक, सांघिक व सांस्कृतिक स्पर्धेत भाग घेवून आपले वर्चस्व सिद्ध करत प्राथमिक विभागातून चॅम्पियन ठरली.

तालुक्यातील राजाराम केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरदागुडा, तेलगुगुडा व भिमारगुडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुरदागुडा येथे पार पडलेल्या केंद्रस्तरीय शालेय बालक क्रीडा तथा संस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचे उदघाटक सरपंच लक्ष्मीबाई मडावी, अध्यक्ष रामाजी भसारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अंकलू बुर्ले, हेमंत सभावट, वैकुंठम आकुदारी, संतोष सिडाम, सरपंच मंगला आत्राम, प्रणाली सिडाम, राजाराम दुर्गे, अनुप्रिया मुंजमकर, बाबुराव चापले, विलास बोरकर, गुलाब देवगडे, तुकाराम जुमडे, मनोहर भसारकर, यादव बोरकर, निर्मला रत्नम, दिलीप गावडे, सुधाकर दुर्गे, केंद्रप्रमुख सुनील आईंचवार, मुख्याध्यापक अजय पस्पूनुरवार उपस्थित होते. या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात वैयक्तिक, सांघिक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत केंद्रातील एकूण 19 शाळेने सहभाग नोंदविला.

सदर स्पर्धा महोत्सवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ताटीगुडम शाळेने प्रत्येक स्पर्धेत हिरीरीने भाग घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले. शाळेने प्राथमिक विभागात मुले कबड्डी प्रथम, मुले खोखो प्रथम, मुली कबड्डी प्रथम मुली खो-खो प्रथम, प्राथमिक विभाग सांस्कृतिक स्पर्धा द्वितीय, रिले दौड प्रथम तर माध्यमिक विभागात मुले खोखो द्वितीय, मुली कबड्डी द्वितीय, मुली व्हॉलीबॉल द्वितीय व माध्यमिक विभाग सांस्कृतिक स्पर्धा प्रथम पारितोषिक पटकावित शाळा प्राथमिक विभागातून चॅम्पियन ठरली. यावेळी बक्षीस वितरक म्हणून पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश मानकर उपस्थित होते.

शाळेच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. शाळेच्या यशस्वी वाटचालीत शाळेचे मुख्याध्यापक मुख्त्यार शेख, विषय शिक्षक रामदास कोंडागोर्ला, शिक्षक हनुमंतू पेंदाम, लोकेश दुर्गे, प्रांजली रामटेके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

हे पण पहा,