वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ७ ते ११ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 25 एप्रिल : इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी विजेतेपद अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसाठी  भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताचा 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघ ७ ते ११ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. बीसीसीआयने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. ऋषभ पंतच्या जागी यष्टीरक्षक म्हणून केएस भरतला संधी देण्यात आलीय. कसोटी संघात अजिंक्य रहाणेचं पुनरागमन झालंय. तर सूर्यकुमार यादवला मात्र संधी मिळाली नाही.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

हे पण वाचा :-

ICC World Test ChampionshipTeam India