टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे असरअल्लीत बक्षीस वितरण

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी आणि भाजपा प्रदेश सदस्य आदिवासी आघाडीचे संदीप कोरेत यांची उपस्थिती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिरोंचा, दि. १३ मार्च: असरअल्ली येथे स्पोर्टींग क्लब द्वारा आयोजित भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी  पहिले पारितोषिक असरअल्ली पोलीस स्टेशन मार्फत पोलीस उपनिरीक्षक मंदार पुरी यांच्याकडून तर दूसरे पारितोषिक वनपरिक्षेत्र अधिकारी असरअल्ली चेतन पाटील यांच्या तर्फे आणि तिसरे पारितोषिक संदीप कोरेत यांच्याकडून असे तीन पुरस्कार कार्यक्रमा ठिकाणी प्रदान करण्यात आले होते.

         सदर स्पर्धेमध्ये छत्तीसगड, तेलंगणा राज्यासह एकूण ४५ चमुनी सहभाग नोंदविला गेला. तब्बल टेनिस बाल क्रिकेट स्पर्धा १६ दिवस सुरू होती. सदर स्पर्धेत अजिंक्यपद सिरोंचा संघांनी पटकविले तर दुसरे पारितोषिक असरअल्ली स्पोर्टिंग क्लब यांनी पटकविले आणि तिसरे पारितोषिक असरअल्ली येथील स्थानिक गावातील संघांनी पटकाविला.

क्रीडास्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम अयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत स्वामी उपविभागीय अधिकारी सिरोंचा म्हणून तर मुख्य अतिथी संदीप कोरेत भाजप आदीवासी आघाडी चे प्रदेश सद्स्य आणि मंचावर पोलीस उपनिरीक्षक बहिरम, गावकरी संजय जैनवार, रमाकांत गंगूरी, तंटामुक्त अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम, सांबम सोमनपल्ली, रवी गुडीमेटला आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

  बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी मंचावरून प्रतिपादन करतांना संदीप कोरेत म्हणाले पोलीस विभाग अहेरी उपविभागाला मिळालेले वरदानच आहे आज पोलीस विभागातर्फे ग्रामीण भागात गरजूंना साहित्याचे वाटप होत आहे. तर आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता पोलीस स्टेशन मार्फत मेळावे घेऊन केल्या जात आहे. ज्या ठिकाणी सरकारी यंत्रणा पोहचत नाही त्या ठिकाणी पोलीस विभाग पोहचून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत आहे. पोलीस भर्ती पूर्व प्रशिक्षण घेऊन  बेरोजगार युवकांना शिक्षित करण्याचे काम  निशुल्क पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे. या भागातील भौगोलिक परिस्थिती बघता अनेक लोकोपयोगी कार्यक्रम मेळाव्याच्या माध्यमानी करत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमानी पोलीस विभागाला अशी विनंती आहे की, आपण मोठे मोठे ग्रामीण खेळाचे आयोजन करून त्यातील प्रतिभावंत खेळाडूना आपल्या विभागामार्फत स्पोर्टींग क्लबमध्ये पाठवावे; जेणेकरून तो तिथे आपला कौशल्य दाखवून आपल्या भागाचा व पोलीस विभागाचा नावलौकीक करेल.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी यांनी आयोजक मंडळाचे कोणतेच गालबोट न लागता चांगल्या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल क्रीडा मंडळाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन खुर्शीद शेख यांनी केली तर आभार चंद्रशेखर पुलगम तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केले.       
        

asarallicrickettournamentprizedistributionsandipkoret