लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बुलडाणा, दि. ९ ऑक्टोंबर : बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य आणि तेथील नैसर्गिक सौंदर्याची माहिती सर्वांना व्हावी या दृष्टिकोनातून फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन बुलडाणा येथे करण्यात आले होते
बुलडाणा शहरानजीक राजूरचा घाट आणि बोथा जंगल हे ज्ञानगंगा अभयारण्य अंतर्गत येत असून येथे वेगवेगळ्या प्रकारची वनसंपदा आहे. या नैसर्गिक अभयारण्याची माहिती सर्वांना व्हावी व पर्यटन वाढवावे या दृष्टिकोनातून बुलडाणा अर्बन, सायकलिंग ग्रुप, ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स, रणबळीज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.०० वाजता बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मान्सून मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली.
ही स्पर्धा २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर आणि महिलांसाठी तीन किलोमीटरची आयोजित करण्यात आली होती
ज्यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धावपटूसह, जवळपास दीड हजार क्रीडाप्रेमी, निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या भयावह संकटानंतर ही मॅरेथॉन पार पडत असल्याने स्पर्धकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला, या स्पर्धेमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या सर्वांनीच स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. मॅरेथॉन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झुम्बा डान्सचा देखील स्पर्धकांनी आनंद लुटला.
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आयरनमॅन नितीन घोरपडे , बुलडाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया बुलढाणा अर्बनचे सीएमडी डॉ सुकेश झंवर, बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
हे देखील वाचा :
सुरजागड येथून खनिज वाहतूक करणाऱ्या ४० वाहनांवर कलम २८३ अंतर्गत कारवाई