तिहेरी हत्याकांड प्रकरणात 5 जणांना जन्मठेप इतर निर्दोष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. ३ फेब्रुवारी : केज तालुक्यातील मांगवडगाव येथे मे २०२० रोजी जमिनीच्या वादातून पारधी समाजावर केलेल्या हल्ल्यात पारधी समाजातील तिघांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता.तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. त्या महाराष्ट्रातील पारधी समाजातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून इतरांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे

प्राप्त माहितीनुसार, केज तालुक्यातील मांगवडगाव येथे पारधी समाजातील पवार आणि सवर्ण समाजातील निंबाळकर यांच्या अनेक वर्षापासून जमिनीचा वाद सुरू होता. अनेक वेळा यांच्यात मारामाऱ्या देखील झाल्या होत्या आणि हातपाय देखील फ्रॅक्चर झाले होते. दरम्यान २००६ मध्ये न्यायालयाने वादग्रस्त जमिनीचा निकाल हा पवार यांच्या बाजूने दिला होता.

हे देखील वाचा : 

“या” बिल्डरच्या बॉडिगार्ड्सकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वाब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला १० वर्षाची शिक्षा

वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

 

 

 

lead news