लातूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने होणार ७० फूट उंचीचा पुतळा उभारणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

लातूर, दि. २१ मार्च : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लातूर शहरात आंबेडकरी अनुयायांनी जोरदार तयारी सुरु केली असून यामध्ये लातूरच्या खासदारांनी विशेष भर टाकली आहे.

शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क याठिकाणी बाबासाहेबांच्या ७० फूट उंचीच्या पुतळा उभारणी कामाला सुरुवात झाली असून दिवसरात्र हे काम सुरु आहे. १३ एप्रिल पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. स्टॅचू ऑफ नॉलेज या नावाने हा पुतळा तयार करण्यात येत आहे.

या पुतळ्याचं अनावरण १३ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर १४ एप्रिल म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी पुतळ्यासह परिसरात हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांचे सुपुत्र शंकर शृंगारे यांनी दिली आहे. फायबर, प्लास्टिक आणि प्लास्टर याचा वापर करून तयार करण्यात येत असलेली हि मूर्ती राज्यात पहिलीच आहे हे विशेष.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! शेतकऱ्याची स्वतच्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा 14 लाखांचा प्रतिष्ठित संशोधन प्रकल्प गोंडवाना विद्यापीठाला मंजूर

 

lead news