समुद्रकिनार्‍यावर आढळले भलेमोठे मृत कासव

बदलत्या हवामानाचा समुद्र जीवानाही बसतोय फटका.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सिंधुदूर्ग, दि. २६ जानेवारी :  सध्या निसर्गामध्ये हवामान बदलामुळे होत असलेल्या परिणामांचा सर्वांना फटका बसत आहे. यातून समुद्री जीवही सुटलेले नाहीत. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा समुद्रकिनारी भलेमोठे कासव मृतावस्थेत किनाऱ्यावर आढळून आले.

यातून बदलत्या हवामानाचा परिणाम समुद्री जीवांवर रही होत असल्याचे दिसत आहे. सध्या समुद्राचे पाणीही वाढले असून मोठ मोठी अजस्त्र लाटातुन किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत.अलीकडे कासवे मृत अवस्थेत आढळत आल्याने कासव अभ्यासक याना हा विषय सतावत आहे.

हे देखील वाचा :

देशभरातून 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर

लसीकरणामूळे कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली – राज्यमंत्री, डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर