..पुन्हा नक्षलवाद्यांनी केली तरुणाची हत्या

नक्षल सप्ताहात दोन तरुणाची हत्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : नक्षलचां 28 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत नक्षल्यांचा शहीद सप्ताह म्हणून मिरवत असतात. अशातच नक्षल अघटीत कृत्य करीत असतात आणि  याच सप्ताहात दुसऱ्यांदा भामरागड तालुक्यातील निळगुळवंचा दुर्गम गावातील लालू मालू दुर्वा (40 वर्षे )तरुणाची पोलीस खबर्या असल्याच्या संशयावरून हत्या केली असून आज दि, 31 जुलै पहाटेच्या सुमारास  घटना उघडकीस आली आहे ..

नक्षल सप्ताहात दोन तरुणाची हत्या..

शहीद सप्ताह दरम्यान नक्षल्यांनी मंगळवारी रात्री लालू ध्रुवा यांना झोपेतून उठून बाहेर नेले आणि त्यानंतर त्याची हत्या केली . हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळ एक चिठ्ठी टाकली आहे असून त्यात लालू  हा पोलिसाचा खबऱ्या होता. त्यामुळे आम्हाला कॅम्प सोडून पळावे लागले आहे .म्हणूनच संधी मिळताच त्याची हत्या केली असल्याचे नक्षल्याने चिठ्ठीत लिहिले असून खाली पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी असा उल्लेख आहे . तर 25 जुलै रोजी भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे यांची ही नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या गोळीने हत्या केली होती . त्यामुळे सप्ताहात ही दुसरी हत्या केलेली आहे.

गडचिरोली पोलीस अधीक्षकनक्षल हत्या