लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सिंधुदूर्ग, दि. २६ जानेवारी : सध्या सोशल मीडियावर वेंगुर्ला निवती समुद्रात असलेल्या दिपगृह जवळील एका खडकातील अप्रतिम दृश्यं व्हायरल होत आहे. समुद्राच्या लाटांमुळे उभ्या खडकाला असलेल्या भेगेत पाणी जाऊन पाण्याचा उंच असा तुषार उडतो. हा नैसर्गिक फवाऱ्याचं अतिम दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्थानिक भाषेत याला म्हातारीची चुळ असं म्हटलं जातं. हे त्याठिकाणी जाणाऱ्या स्थानिकांनी दिलेलं नाव आहे. मात्र समुद्रात उभ्या असलेल्या दीपगृहाजवळ गेल्यानंतर हे दृश्य नजरेस पडत आणि त्याची भुरळ सर्वांनाच पडत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा :
प्रजासत्ताक दिनानिमित्त एका युवतीने भारतातील २६ वैशिष्ट्यांची साकारली रांगोळी….