लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबईतील मालाड परिसरातील मढ कोळीवाड्यातील मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तिसाई बोट बुडाल्याची दुर्घटना काल रात्री १२.०० ते १२.३० च्या सुमारास घडली आहे.
मुंबई : 18 डिसेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटीला भारतीय नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार धडक देवून झालेल्या दुर्घटनेत नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह १३ जणांचा मृत्यू झाला.होता. ही घटना ताजी असताना व सदर दुर्घटनेतून मुंबई अद्याप सावरलेली नसतांना त्यातच आता मुंबईच्या मढ समुद्रकिनारी एक मासेमारी करणारी बोट बुडाल्याची घटना घडलेली आहे.
मुंबईतील मालाड परिसरातील मढ कोळीवाड्यातील मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तिसाई बोटीला काल रात्री १२.०० ते १२.३० च्या सुमारास एका मालवाहू जहाजाने धडक दिली. त्यामुळे ही बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा दुर्देवी अपघात झाला. या बोटीला सुदैवाने त्यावेळी आजूबाजूला काही बोटी असल्याने मासेमारी करण्यासाठी गेलेल्या कोळी लोकांचा जीव वाचला.
मालाडमधील मढ परिसरातील हेमदीप हरिश्चंद्र टिपरी हे नेहमीप्रमाणे मढ कोळीवाडा या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी चायनाच्या एका मालवाहू जहाजाने त्यांच्या मासेमारी करणाऱ्या नौकेला धडक दिली. त्यामुळे ही नौका बुडाली. या नौकेवर असणारे तांडेल/खलाशी यांना बाजूला असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकांनी सुखरुप बाहेर काढले. तसेच याच ग्रुपच्या आठ बोटीने नौका बांधून आणली. आज ही नौका मढ, तलपशा बंदरात पोहोचण्याचा अंदाज आहे. यावेळी नेव्ही/कोस्ट गार्डचे जहाज बरोबर आहे. तसेच दोन अधिकारी रात्रीपासून नौकांवर मदत करत आहेत.
हे देखील वाचा,
सीसीआयकडून खरेदी केंद्र मंजूर : हमी भावाने कापूस विकण्याचा मार्ग मोकळा !