इंडियाज वर्ल्ड रेकॅार्ड मानांकन प्राप्त यश देशमुखचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडून कौतूक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. १५ फेब्रुवारी : जिल्ह्यातील वायगाव (निपाणी) या छोट्याशा गावातील सर्वसाधारण कुटुंबातील आणि अवघ्या नवव्या वर्गात शिकणाऱ्या यश देशमुख या विद्यार्थ्याने यंगेस्ट मोटिव्हेशनल स्पिकर म्हणून देशपातळीवर इंडियाज वर्ल्ड रेकॅार्ड मानांकन प्राप्त केले आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज यशचे कौतूक केले. जिल्ह्यातील विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजे, असे यशचा गौरव करतांना त्यांनी सांगितले.

यश देशमुख महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयातील केंद्रीय विद्यालयाचा वर्ग नववीचा विद्यार्थी आहे. तो वयाच्या बारा वर्षांपासून मोटिव्हेशनल स्पिचमध्ये पारंगत आहे. वेगवेगळ्या विषयावर सातत्याने प्रेरणात्मक व्याख्याने देत असतो. त्यामुळे त्याला सातत्याने व्याख्यानांसाठी वेगवेगळ्या स्तरावरून निमंत्रित केले जात असते. इंडियाज वर्ल्ड रेकॅार्ड या संस्थेच्यावतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्तींना देशपातळीवर मानांकीत केले जाते.

यशला शालेय विद्यार्थी या गटातून यंगेस्ट मोटिव्हेशनल स्पिकर म्हणून देशपातळीवर इंडियाज वर्ल्ड रेकॅार्डचे मानांकन प्राप्त झाले आहे. तो आता एशिया इंडिया बुक रेकॅार्डची तयारी करत असून यामध्ये सुध्दा मानांकन मिळेल, असे तो आत्मविश्वासाने सांगतो. यशने आपले वडील महेंद्र देशमुख यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी त्याचे कौतूक केले. जिल्ह्यातील मुले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजे. खुप मोठा हो आणि जिल्ह्याचे नाव मोठे करं, अशा शुभेच्छा देखिल जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी देखिल यशचे कौतूक केले आहे.

हे देखील वाचा : 

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

अतिक्रमण हटावच्या नावाखालील गरिबांवरचा अन्याय थांबवा : शेतकरी कामगार पक्षाची नगर विकास मंत्र्यांकडे मागणी

अल्पसंख्याकांसाठी कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आता मिळणार ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज

 

lead news