मिठाई खाताय… तर सावधान, केमिकलने बनवलेला लाखो रुपयांचा बनावट खवा जप्त…

खव्यापासून तयार केलेलेले पेढे, बर्फी, मिठाई पदार्थ खाताय मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड, २५ नोव्हेंबर : बीडचे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना दुधाच्या पावडरपासून बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कुकृत्याची गुप्त माहिती मिळाली असता केज ते बीड जाणाऱ्या रोडवर विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासमोर उमरी शिवारात व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनीचे मालक धनंजय महादेव चोरे यांच्या कंपनीमध्ये दुधाच्या पावडरपासून बनावट खवा तयार करुन त्याची बाहेर जिल्ह्यात विक्री केली जात असते, अशी माहिती कुमावत यांना मिळाली. असता कंपनीवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. आरोपींचा दुधाच्या पावडरपासून खवा बनवण्याचा गोरख धंदा सुरु होता. पोलिसांनी या बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी दुधाच्या पावडरमध्ये वनस्पती, रुची तेल मिक्स करुन त्यापासून बनावट खवा तयार करायचे. पोलिसांना या छापेमारीत तब्बल २९५८ किलो बनावट खवा मिळाला आहे. या खव्याची किंमत ५ लाख ३७ हजार ४८० रुपये इतकी आहे.

पोलिसांनी या कारखान्याची झडती घेतली असताना त्यांना एक लिटरही दूध सापडलं नाही. आरोपी खवा तयार करण्यासाठी केमिकलचा वापर करायचे, असं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे आरोपी लोकांच्या जीविताशी खेळत होते, हे आता स्पष्ट झालं आहे. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून  संबंधित कारखान्यात तयार होणारा माल हा औरंगाबाद, हैदराबाद, बंगळुरु एवढंच नाही तर इतर परराज्यात देखील जात असल्याचे समोर आले आहे. या कारवाईनंतर लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी सुधा केली आहे.

पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद हस्मी आणि अन्न सुरक्षा अधिकारी पथक यांना बोलावून संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन रात्री ९ वाजता ही कारवाई केली. पोलिसांनी संबंधित कारखान्यात छापा टाकला तेव्हा दुधाच्या पावडरमध्ये वनस्पती रुची तेल मिक्स करुन त्यापासून तयार केलेला खवा संशयित वाटला. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सर्व खाद्यपदार्थ जप्त केला. खाद्यपदार्थांची सीए तपासणी सुरु आहे. तसेच पोलिसांनी संबंधित कंपनी पुढील आदेशापर्यंत सील केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकांनी खरेदी करताना काळजी घ्यावी. अन्यथा केमिकलयुक्त, दूध विरहित खाल्ल्यामुळे गंभीर आजाराला आमंत्रण दिले जाऊ शकते.

हे देखील वाचा :

राज्यभरात एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु, शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड

केंद्र सरकार नवं विधेयक मांडणार… इंधन दरवाढीनंतर आता वीजबिलंही महागणार?

संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम

 

cmCM Uddhav Thackareylead news asp pankaj kumawat