17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
भंडारा, दि . 9 जानेवारी: जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शनिवारी जवळपास 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली. यात 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे.
रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्ण युनिट मधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता खोलीत मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत.
यापैकी मॉनिटर मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.
आरोग्यमंत्र्यांकडून दुर्घटनेची माहिती
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य रुग्णांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.