आयपीएलमधील उर्वरित सामने ‘या’ देशात IPL होणार, BCCI चा महत्त्वाचा निर्णय

बीसीसीआयच्या आज झालेल्या बैठक हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 29 मे:- आयपीएलच्या चौदाव्या मोसमावरील अनिश्चिततेचे ढग आता दूर सरले आहेत. कारण आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचं आयोजन आता संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये होणार आहे. बीसीसीआयच्या आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठक हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या संसर्गा मुळे ही स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

19 किंवा 2० सप्टेंबर रोजी आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊ शकते. चार क्वालिफायर, सात डबल हेडर (एकाच दिवशी दोन मॅच) आणि दहा सिंगल हेडर (एकाच दिवशी एक मॅच) असे उर्वरित आयपीएल स्पर्धेचे स्वरुप असेल. आयपीएल स्पर्धेची सुरुवात वीकेंडला होईल आणि फायनल देखील वीकेंडला होण्याची शक्यता आहे.कोरोनामुळे भारतात ही स्पर्धा होणार नसल्याचे याआधीच स्पष्ट झाले होते. अबूधाबी, दुबई, शारजाह या तीन ठिकाणी हे सामने होतील, अशी माहिती आहे.

बीसीसीआयने दोन सामने टाळण्यानंतर अखेर 3 मे रोजी चौदावा मोसम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. चौदाव्या मोसमात साखळी फेरी आणि प्ले ऑफ असे एकूण 60 सामने होते. ही स्पर्ध स्थगित होईपर्यंत 29 सामने खेळवण्यात आले होते तर आता उर्वरित 31 सामने यूएईमध्ये खेळवले जातील.

BCCICovid ipl2021ipl 2021 in UAEIPL2021