वनविभागातील चाराकटर व महावत यांचे रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी : जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये रोजंदारी च्या भरवशावर शासकीय हत्ती कॅम्प सुरू आहे. मागील वर्षी ताडोबा मध्ये प्रशिक्षित महावत नसल्यामुळे एका हत्तीच्या हल्ल्यामध्ये हत्ती देखभालीच्या काम करणाऱ्या चाराकटर चा जीव गमवावा लागला.

तसेच गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा महावत चाराकटर चे ७० टक्के पदे रिक्त आहेत. आलापल्लीत तीन आणि कमलापूर येथील ९ हत्तीनां तीन महावत व एक चाराकटर आहे. बाकीच्या रोजंदारी च्या भरवशावर काम सुरू आहे.

हत्तीकॅम्प मध्ये सुद्धा हत्तीच्या हल्ल्यामध्ये पदे रिक्त असल्यामुळे एका महावताला जीव गमवावा लागला होता. व तेथील लहान हत्ती प्रशिक्षणापासून वंचित आहे. योग्य वयात त्यांना प्रशिक्षण न दिल्याने भविष्यात त्यांना हत्तींकडून कर्मचाऱ्यांना धोका होईल.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या पाच हत्ती आहे. पाच हत्तींना १ महावत व ३ चारा कटर आहे व रोजंदारी भरोशावर काम सुरू आहे. महाराष्ट्रात कुठल्याच कॅम्प मध्ये अनुचित प्रकार घडू नये. याकरिता महावत चाराकटर चे पदभरती तात्काळ काढण्यात यावी अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा  :

सोशल मीडियावरून मदतीचे केले आवाहन आणि उभा राहिला ‘त्या’ निराधार आजीसाठी निवारा…

अहेरीत जावयाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून 1500 रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

 

Elephant post recruitment demandlead story