धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले- करूणा शर्मा

माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली शर्मा .. करुणा शर्मा यांना बीड पोलिसांनी केली अटक.

 लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,

बीड, दी ६ सप्टेबर :- धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती बाळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फासवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली .असा आरोप करुणा शर्मा यांनी केली.

करुणा शर्मा यांना परळी पोलिसांनी केली अटक 

परळी येथील वैजनाथ मंदिराच्या समोर दर्शनासाठी आल्यानंतर करुणा शर्मा यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला गेला होता या नंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये शस्त्र आढळून आले यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून मेडिकल साठीनेत असताना त्यांनी असे आरोप केले.

करुणा शर्मा यांना अटक केल्यानंतर प्रतिक्रिया

परळी शहरात करुणा शर्मा च्या पार्श्‍वभूमीवर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मंदिराच्या समोर करुणा शर्मा यांना अडवले यावेळी परळीतील महिला नेत्यांना जाब विचारला परिस्थिती तणाव निर्माण होत आहे हे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना मंदिराच्या समोर रोड बाहेर काढून दिले पुन्हा मुंडे समर्थक आणि त्यांची गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शहर पोलीस ठाण्यात घेऊन आले यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता तरी वाळूवर आढळून आला मात्र या प्रकरणात हा रिवाल्वर व माझ्या वरील खोटे गुन्हे धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर करून करत असल्याचा आरोप करून शर्मा यांनी केला आहे

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यामधील वाद काय आहे.

करुणा शर्माची बहीण रेणू शर्मा हिने सर्वात अगोदर मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशन याठिकाणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.तसेच ट्विट करत तक्रारीची कॉपीपोस्ट केली होती. यावेळी रेणू शर्मा यांनी गंभीर आरोप केले होते.
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या मधील संबंध व प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली तसेच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते.
काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्या वर हे प्रकरण तीन चार महिने शांत झाले यावेळी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या सोबत घटस्पोट प्रकरण न्याय प्रविष्ट आहे कोर्टामध्ये केस सुरू असल्याचे फेसबुक वरील पोस्ट मध्ये नमूद केले होते मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणा शर्मा या संपत्ती पासून सामाजिक आणि राजकीय विषयावर ती कायम भाष्य करत होत्या तसेच फेसबुक लाईव्ह करत सांगितले होते.
त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मी परळी मध्ये येणार आहे म्हणत त्यां संगीतल्या प्रमाणे दाखल झाल्या तसेच पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे असं सांगितल्यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आणि आज दुपारी दोनच्या दरम्यान करुणा शर्मा या परळी मधील वैद्यनाथ मंदिराच्या समोर दाखल झाल्या होत्या.

 

हे देखील वाचा,

अपने को तो रायता फैलाना है, अपने को तो पैसे निकालने है प्रेशर बनाके… करुणा शर्माची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

 

cf dr kishor mankar pccf reddi cmo CM Uddhav Thackareydhanjay mundelead news