GOOD NEWS: DRDO आज लॉन्च करणार 2-डीजी अँटी कोविड औषध

ऑक्सिजन तुटवड्याचं संकट होणार कमी

नवी दिल्ली 17 मे :- देशभरात कोरोनानं  थैमान घातलं असून या महामारीविरोधात लढण्यासाठी देशाला आणखी एक हत्यार मिळालं आहे. 2-DG हे औषध आजपासून मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. 2-DG हे भारतीय शास्त्रज्ज्ञांनी बनवलेलं अँटी-कोविड औषध आहे. हे औषध कोरोना महामारीविरोधात गेमचेंजर ठरु शकतं तसंच कोरोनाला हरवण्यासाठी मोठं शस्त्र ठरु शकतं. DRDO च्या शास्त्रज्ज्ञांच्या रिसर्च आणि मोठ्या परिश्रमानंतर भारतानं कोरोनाविरोधात हे औषध तयार केलं आहे. यातून लोकांना दिलासा मिळण्याची पूर्ण आशा आहे. सोमवारी या औषधाच्या 10 हजार डोसची पहिली खेप लॉन्च केली जाईल. यानंतर हे औषध कोरोना रुग्णांना दिलं जाईल.

दुसऱ्या आणि तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलमध्ये या औषधांचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत. मे ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या ट्रायलमध्ये या औषधानं कोरोना रुग्णांवर चांगलं काम केलं तसंच ते सुरक्षितही ठरलं. DRDO च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की हे औषध रुग्णांना लवकर रिकव्हर होण्यासाठी मदत करतं तसंच त्यांची ऑक्सिजनवरील निर्भरतादेखील बरीच कमी करतं. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आज म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीला 2-DG औषधाच्या 10,000 डोसची पहिली खेप लॉन्च केली जाईल आणि रुग्णांना हे दिलं जाईल. निर्माते भविष्यात उपयोगी यावं यासाठी याचं उत्पादन वाढवण्यासाठी काम करत आहेत. हे औषध डॉक्टर अनंतर नारायण भट्ट यांच्यासह शास्त्रज्ज्ञांच्या एका टीमनं बनवलं आहे.