लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी 18 जुलै :- अहेरी तालुक्यातील राजाराम खां उप पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या निमलगुडम नजीक गावालगत रस्त्याच्या लगत उभ्या असलेल्या महिंन्द्रा पिकअप वाहनात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहनातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी राजाराम खांदला येथील पोलिसांना माहिती दिल्यानंतर इसमाचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे.
आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्र.353 क वर निमलगुडम ते गोलाकर्जी दरम्यान रस्त्याच्या कडेला नाल्याच्या नजीक उभ्या असलेल्या एमएच-33-G-1349 क्रमांकाच्या पीकअप वाहनातून दुर्गंधी येत असल्याची माहितीनागरिकांना मिळताच वाहनात बघितले असताना एका इसमाचा मृतदेह पडून दिसला नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.चारचाकी वाहनावर असलेल्या भ्रमणध्वनी नंबर वर पोलिसांनी संपर्क केले असता वाहन चालक आणि मालकाची माहिती मिळाली आहे. इसमाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसले तरी शवविच्छेदयानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
वाहन मालक रवीकिरण भेंडारे यांच्याशी संपर्क केले असता, वाहन चालकाचे नाव प्रमोद दुधबळे असून तो नवेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती त्यांनी दिली.शनिवारी 16 जुलै रोजी आश्रम शाळेचे राशन घेऊन कमलापूर येथे गेल्याची माहिती त्यांनी दिली.रेशन उतरवून परत येताना नेमकं काय झालं याची माहिती कोणालाच नाही.सदर वाहनातून दुर्गंध येत असल्याने कदाचित शनिवारीच वाहन चालकाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात राजाराम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पुढील तपास करीत आहेत.
हे देखील वाचा :- कुंभी मोकासा येथील आपत्कालीन रुग्णाला बोटीने बाहेर काढून दवाखान्यात केले भरती. https://loksparsh.com/maharashtra/an-emergency-patient-from-kumbi-mokasa-was-taken-out-by-boat-and-admitted-to-hospital/27678/
तलवाडा येथील आदिवासी सेवा मंडळाच्या महाजन गुरुजी आश्रम शाळेचा अनागोंदी कारभार …
मुलांना अंघोळीसाठी नाल्यातील गढूळ पाण्याचा आधार… https://www.youtube.com/watch?v=Vc9KKFLWnfE