लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रायपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातील अबूझमाड या भागात नक्षलवादी मोठया प्रमाणावर असून तेथील घनदाट जंगलाचा फायदा घेतात. हा परिसर सीमाभागात येत असून या क्षेत्रात नक्षलवादी नक्षलवादी आपले नेटवर्क वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकार आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद मूळापासून संपवून टाकण्याकरिता सरकार प्रयत्न करत आहे. सातत्याने सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झालेली पाहायला मिळते. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली असून या चकमकीत सुरक्षा यंत्रणेने 3 नक्षलवाद्यांना ठार केल्याची माहिती आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सोरेनाम जंगलात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी आमनेसामने आले. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा यंत्रणेने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत 3 नक्षलवादी मारले गेले असून डीआरजी आणि एस्टीफ जवनांनी अजूनही सोरेनाम जंगलाला वेढा घातला असून जवळजवळ 300 पेक्षा जास्त जवानाणी संपूर्ण जंगल वेढले असून नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सदर कारवाईत सुरक्षा यंत्रणेने तीन नक्षलवाद्यांना ठार केले असून त्यांचे कडून अनेक ऑटोमेटिक शस्त्र जप्त केली आहेत. तसेच मारलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. बस्तर पाठोपाठ या भागात नक्षलवादी आपले नेटवर्क वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. चमक झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सर्च ऑपरेशन राबवत आहे. या जंगलात आणखी नक्षलवादी लपले असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. गृहमंत्री अमित शहा हे छत्तीसगड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सुरक्षा यंत्रणेला नक्षलवादाविरोधातील कारवाई आणखी कडक करण्याचे निर्देश दिले होते. तसेच नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे राज्य सरकारच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणा मोठ यश मिळालं आहे.असून या ठिकाणी जवानांना मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक शस्त्रे सापडली आहेत. या क्षेत्रात नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर सुरक्षादलाच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले. दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल सुरक्षा जवानांनी कारवाई केली. यामध्ये ३ नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांकडे AK 47 देखील असल्याचे समोर आले आहे. या चकमकीनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा,
नववर्षाचा आनंद द्विगुणित : १५ परिवारात आले तान्हुले पाहुणे !
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा
गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन