लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, दि. १७ फेब्रुवारी : स्वीमिंग फेडरेशन आफ इंडिया आणि महाराष्ट्र असोशिएशन यांच्यातर्फे महाराष्ट्र स्टेट लेवल स्पर्धा 12 फेब्रुवारी 2023 ला मुंबई येथे घेण्यात आली. सदर स्पर्धा लाइट हाऊस समरॉक ते गेट वे ऑफ इंडिया 5 कि मी होती. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील एकच व्यक्तीने भाग घेतला असून ते पोलीस कर्मचारी बाबासाहेब विकास वासनिक होते. यात महाराष्ट्रातील हजारो स्पर्धक सहभागी झाले होते ..
याच स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव पोलीस कर्मचारी बाबासाहेब वासनिक यानी 25 ते 45 या वयाच्या -7 व्या ग्रुपमध्ये 550 लोक सहभागी झाले असून त्यांनी या 5 किलोमीटर समुद्र पोहण्याच्या शर्यतीमध्ये 10 या क्रमांकावर येत गडचिरोली जिल्ह्याचे आणि गडचिरोली पोलीस दलाचे नाव लौकिक केले आहे.
या यशाबद्दल मुंबई येथे त्यांना प्रमाणपत्र, मेडल आणि गिफ्ट देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे बाबासाहेब वासनिक यांनी ही स्पर्धा 1 तास 8 मिनीटे 22 सेकंड मध्ये पूर्ण करून 10 वा क्रमांक पटकाविला.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी असलेले बाबासाहेब विलास वासनिक हे गडचिरोली जिल्हयातील, तालुक्यातील मुरखळा येथील रहवासी आहेत. सन 2011 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी यांची गडचिरोली पोलीस दलात नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या वडील विलास शंकर वासनिक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक कॉम्लेक्स येथील क्रिडा संकुल परिसरात ‘जलतरण तलावात सुरुवात केली. जिल्हा पोलीस दलातील -60 पथकात कार्यरत असतानाही त्यांनी जलतरणाचा सराव करित पोहण्याचा छंद जोपासत कायम ठेवला आहे.
या नंतर यांना प्रतिनियुक्तीवर वीआयपी सेक्युरिटी, मुंबई येथे कार्य बजावत असताना 2018 मध्ये झालेल्या मालवण येथे 3 किमी जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचे नाव उंचावले होते. त्यांनी आतापर्यंत विविध स्पर्धामध्ये 21 सुवर्ण पदक व 41 रजत पदक आणि 4कांस्यपदक पदक प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे समुद्रात जलतरण करणारे गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस कर्मचारी बाबासाहेब विलास वासनिक हेच आहेत. आता यानंतर त्यांना जिल्ह्यातील पहिला आयरन मॅन हा ‘किताब मिडवून जिल्ह्यातील पहिला व्यक्ती होण्याचा मान मिडवायचा आहे तरी त्या साठी ते रोज सकाळी त्याचा सराव करीत आहेत.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना साहेब , पोलीस महानिरीक्षक क्रिष्ण प्रकाश (मुंबई सिक्युरिटी), गडचिरोली चे पोलिस अधीक्षक
निलोत्पल साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर, पोलीस सहायक निरिक्षक वाकडे साहेब, जलतरण कोच त्रिपाद बल्की (चंद्रपुर) बाळू रामटेके, मंगलसिंग राठोड, सचिन राऊत यांना दिले आहे.
हे देखील वाचा :