लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सोलापूर, दि. १३ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठीक ठिकाणी नवनवीन कल्पना सुचवून विद्युत रोषणाई तर कुठे मोठं मोठया रांगोळ्या आणि सजावट करताना दिसून येतय.
यातच आता सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणालाही तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच अश्या प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आली.
धरणातून सध्या पाणी सोडण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी या सांडव्यावर सोडण्यात आलेल्या तीन रंगाच्या रोषणाईमुळे धरण जणू भारतीय ध्वज असल्यासारखा भासवतो. या धरणाचे व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी हे धरण पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात येत आहेत. उजनी धरणावर या सोळा दरवाज्यावर केलेली तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई आज पासून करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे.
याचसोबत महत्वाची बाब म्हणजे उजनी धरणातून सध्या १६ दरवाजातून सुमारे ४१६०० क्यूसेक्सने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या चिनाकृती गुरुत्व धरणावर पहिल्यांदाच अशा पध्दतीने विद्युत रोषणाई केल्याने डोळ्याचे पारण फेडणारे दृश्य पाहण्यासाठी सोलापूरकर मात्र गर्दी करताना दिसून येतात.
हे देखील वाचा :
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर; व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर प्रशिक्षिकाची जवाबदारी
https://loksparsh.com/top-news/terrible-accident-bolero-collided-with-a-standing-truck-4-killed-and-1-injured-at-kisan-nagar-from-chandrapur-district/28611/