वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,२६ जुलै : अहेरी तालुक्यातील महागाव (बु )येथील सकाळी शेतीच्या कामाकरीता गेलेल्या शेतकऱ्यावर वीज पडुन जागीच मृत्यू झाल्याची सकाळी 8.30 ते 9:00 वाजताच्या दरम्यान घटना घडली आहे. लक्ष्मण नानाजी रामटेके वय 54 रा. महागाव असे मृत्यू शेतकऱ्याचे नाव आहे.

काल संध्याकाळपासूनच अहेरी परिसरात ढगाळ हवामान असल्याने पावसाची दाट शक्यता होती. आज सकाळीच अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाला. तालुक्यातील अहेरी, महागाव, चेरपल्ली, वांगेपल्ली, नागेपल्ली, आलापल्ली, पुसुकपल्ली आदी गावामध्ये मुसळधार पाऊसाने हजेरी लावली.

काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. महागाव बू येथेही पावसाची सुरवात होताच शेतीचे काम करण्यासाठी बांधावर गेले होते. याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडून ते जमिनीवर कोसळले. घटनेची माहिती मिळताच गावकरी तसेच कुटुंबीयांनी शेत बांधावर धाव घेतले.

त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुली, जावई व नातू असा आप्त असुन घरचा कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्याने रामटेके परिवारावर डोंगर कोसळले असुन महागाव बू परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. रामटेके यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावे म्हणुन अशी मागणी गावकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

हे देखील वाचा ,

नवनियुक्त अधिकारी (IAS) वैभव वाघमारे यांचे अजय कंकडालवार यांनी केले स्वागत

रान मांजर अचानक घरात आली ; आईच्या कुशीत झोपलेल्या जुळी बाळातील एकाला अलगद उचलून नेलं अन्…

 

कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खा. विजय दर्डा आणि मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा

उप विभागीय कार्यालय अहेरीजिल्हाधिकारी गडचिरोलीतहसील कार्यालय अहेरी