लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आरमोरी , दि, २२ जुलै : शेतीचे काम आटपून आपल्या घराकडे परत जात असताना रस्त्यात दबा धरुन बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर अचानक हल्ला केल्याने जखमी झाल्याची घटना कोंढाळा – रवी जंगल परिसरात आज सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली आहे..
वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव गवळीदास तिमाजी गुरनुले (४९) असून कोंढाळा या गावातील रहिवासी आहे .
सध्या शेतीचे हंगाम सुरू असल्याने रोजच्या प्रमाणे आपल्या शेतीचे काम सकाळीच आटपून शेतकरी आपल्या घरी सायकलने जात असताना शेतकऱ्याच्या मार्गावर रस्त्यात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घेतली .त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर व पाठीवर पंजाने वार केल्याने गंभीर जखमी केले मात्र गवळीदासने वाघाला न डगमगता आपल्या जवळ असलेली सायकल वाघाच्या दिशेने भिरकवल्याने वाघाला सायकल लागताच जंगलाच्या दिशेने पडून गेल्याने शेतकरी गंभीर जखमी अवस्थेत वाघाच्या तावडीतून सुटून सुटकेचा श्वास घेतला आहे .
सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच जखमी शेतकऱ्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली असून घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला माहिती देण्यात आल्याने वनविभागाचे वनक्षेत्रपाल के.वाय.कऱ्हाडे वनरक्षक,सलीम सय्यद ,यांनी जखमी शेतकऱ्याची भेट घेत आस्तेने विचारपूस करून घटनेची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत जखमी अवस्थेत असलेल्या शेतकऱ्याला क्षणाचाही विलंब न करता देसाईगंज ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सध्या शेतकऱ्याची प्रकृती स्थिर असली तरी सध्या भातरोवणीचे काम जोरात सुरू असल्याने शेतकरी वाघाच्या हल्ल्यामुळे पुन्हा दहशतीत आले असून आपल्या शेतात जायला घाबरत असल्याने नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे ही मागणी जोर धरू लागली असून लोकप्रतिनिधीने तत्काळ सदर घटनाकडे लक्ष द्यावे .तसेच वन विभागाच्या वरिष्ठ वनाधिकारी यांनी शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यास मदत करण्याचे आवाहनही केले असून अन्यथा वनविभागाच्या कर्मचाऱ्याला नागरिकांच्या रोशालाही समोर जावे लागणारअसल्याचे बोलले जात आहे.