समलैंगिक असल्याचे लपवत तरुणीशी लग्न करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ठाणे, दि. ६ मार्च : समलैंगिक तरुणाने लग्न करून फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने रबाळे पोलिस ठाण्यात दाखल केलेय. वर्षभरापूर्वी या दाम्पत्याचे लग्न झाले होते मात्र लग्नाच्या काही दिवसातच तरुणीला आपल्या पती बाबत संशय आला. तरुणीने पतीचा मोबाईल चेक केला असता आपल्या पतीचे त्याच्या मित्रांसोबत समलैंगिक संबंध असल्याचे समोर आले.

समलैंगिक असल्याची बाब लपवून ठेवत लग्न करून फसवणूक केल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिस ठाणे गाठत पती विरोधात तक्रार दाखल केली. रबाळे पोलिसांनी या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! एक तर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचा खून..

राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा शरद पवार यांनी घेतला खरपूस समाचार

विदर्भ आर्थिक दृष्या संपन्न व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

 

lead news