विरारच्या कोविड रूग्णालयात AC चा स्पोट; १३ जणांचा होरपळून मृत्यू

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वसई 23 एप्रिल:- महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान काही घटनांमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. नाशिकमधील ॲाक्सिजन गळतीमुळे तब्बल २४ जणांचा मृत्यु झाला त्यानतंर आता वसईमधील विजय वल्लभ हॅास्पिटलमध्ये आज पहाटे आग लागली.ज्यामध्ये १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय वल्लभ हॅास्पिटलमध्ये पहाटे ३ च्या दरम्यान आयसीयु विभागातील एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.या विभागात १७ रूग्ण उपचार घेत होते ज्यांच्यापैकी १३ जणांचा मृत्यु झाला असल्याचे कळत आहे. या ठिकाणी जे कोविड सेंटर होते तेथील लोकांना आत दुसरीकडे हलवण्यात येत आहे. महाराष्ट्रात गेल्या २ दिवसांत झालेल्या या दुसऱ्या दुर्दैवी घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये रोष असल्याचे पाहायला मिळत आहे .

रुग्णालयात सेंट्रलाइज एसी असून दोनच मिनिटात आग सगळीकडे पसरली. तसेच या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखळ झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे. यासह रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मात्र या संपूर्ण घटनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आगीत मृत्य पावलेल्या रुग्णांची नावे.

1. उमा सुरेश करगुंटकर (63, महिला)
2. निलेश भोईर (35, पुरुष)
3. पुखराज वैष्णव (68, पुरुष)
4. रजनी कडू(60, महिला)
5. नरेंद्र शंकर शिंदे (58, पुरुष)
6. कुमार किशोर दोशी (45, पुरुष)
7.जनार्दन मोरेश्वर म्हात्रे(63, पुरुष)
8. रमेश उपायन(55, पुरुष)
9. प्रवीण गौडा (55, पुरुष)
10. उमेश राजेश राऊत(23, पुरुष)
11. शमा अरुण म्हात्रे (48, महिला)
12.सुवर्णा पितळे(64, महिला)
13. सुप्रिया देशमुख (43, महिला)

AC blastcovid hospital firedevndraHosptialmodiRajesh Topeshard pawarUddhav tahakarevirar fireVirar palika