वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लालाजी मोहुर्ले यांच्ये घरी वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांनी भेट देऊन कुंटुबियांचे केले सांत्वन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर,

गडचिरोली.दि,१९ ऑक्टोबर :वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बोदली येथील लालाजी मोहुर्ले यांच्ये घरी गडचिरोली वनवृतांचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर , उपवनसंरक्षक, डॉ.कुमार स्वामी,विभागीय वनाधिकारी जमीर शेख , सोनल भडके, यांनी आकस्मिक घरी भेट देऊन कुंटुबियांचे सांत्वन केले .

गडचिरोली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या बोदली जंगलात सिंधी आणण्यासाठी लालाजी मोहुर्ले यांच्यासह गावातील सात इसम (कक्ष क्र.१७९) मध्ये जंगलात दोन ते अडीच किलोमीटर आत जाऊन सिंधी कापत असतांना वाघाने दि,१६ ऑक्टोबर रोज शनिवारला दुपारी १२:३० च्या दरम्यान वाघाने अचानक हल्ला करून गंभीररित्या जखमी केल्याने मोहूर्ले यांची प्रकुर्ती गंभीर  होती. या घटनेची माहिती  वनविभागाला होताच उपचारासाठी नागपूरला मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले  असल्याने  सध्या लालाजी मोहुर्ले यांची उपचारादरम्यान प्रकुर्ती स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती  मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर तसेच परिवारांनी दिली आहे .

बोदली येथे वाघाच्या हल्यात  मोहुर्ले हे जखमी झाल्यापासून  दैनंदिन उपचारासंबंधी माहिती डॉ. किशोर  मानकर हे स्वतः घेवून  आज घरी आकस्मिक भेट देवून परिवाराची संवाद साधल्याने मोहुर्ले परिवारांनी समाधान व्यक्त केले. डॉ.मानकर यांनी मोहुर्ले परिवारांना मेडिकल कॉलेज नागपूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत हिस्त्र पशु घटना संदर्भात प्रमाणित केलेले  पत्र वनविभागाच्या कार्यालयात आणून दिल्यास वनविभागाकडून तात्काळ आर्थिक लाभ मिळवून देऊ असेही डॉ. मानकर यांनी मोहुर्ले परिवारांना सांगितलं आहे.

गडचिरोली वनवृत्तामध्ये वाघाचा वावर असून वेळोवेळी जनजागृती करण्यावर डॉ.मानकर यांनी अधिक भर दिला असून सर्वच अधिनिस्त वनाधिकाऱ्यांना  तश्या सूचना हि केल्या आहे .प्रत्येक  गावागावात लोकांमध्ये जनजागृती तसेच वन्यजीवांचे महत्व पटवून देण्यासाठी वेळोवेळी  मार्गदर्शन होत असल्याने वनविभागाचे  कर्मचारी अधीक सतर्क झाले आहेत.

हे देखील वाचा,

जहाल नक्षली मंगरु मडावी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या उपक्रमातुन ‘भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’मधुन दोन खेळांडुची यु-मुंबा संघाकरीता निवड

परराज्यातून धान आणणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मंत्री, छगन भुजबळ

ajit pawarcf dr kishor mankar pccf reddi cmo CM Uddhav ThackareyClead stori M Uddhav Thakarey