कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी अटक..

- नवी मुंबई मनपाच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. १८ डिसेंबर : नवी मुंबई शहरात लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा भांडाफोड नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. यामध्ये बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यात दोन पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

एपीएमसी मसाला मार्केटमध्ये कोरोनाचे लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच  त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून सात बोगस प्रमाणपत्रके जप्त केली गेलीत. नितीन आंनदराव याचे एपीएमसी मार्केट मध्ये ऑनलाईन सेवा केंद्र आहे. तर विराज वाक्षे व अमोल झेंडे हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी मध्ये कंत्राटी वाहक आहेत.

पोलिसाच्या चौकशीअंती या तिघांनी पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आयडी वापरून बोगस प्रमाणपत्र तयार केले आणि ३ हजार रुपयाला त्याची विक्री करीत असल्याची पोलिसांनी कबुली दिली.

हे देखील वाचा : 

काळविटाची शिकार करून मांसाची मेजवानी करणाऱ्या चौघांना रंगेहाथ केली अटक; वनविभागाची धडक कारवाई

शेतकरी बाप्पा च्या पाठोपाठ मुलानेही केली आत्महत्याच!

प्रियसीने प्रियकरावर झाडली बंदुकीची गोळी!

 

 

 

lead news