नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ व दादाजी भुसे यांच्याकडून विनम्र अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक, दि.२३ जानेवारी :- नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज येवला येथील संपर्क कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार,भास्कर कोंढरे, मोहन शेलार,दिपक लोणारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

राष्ट्रीय हरित लवादाची चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मोठी कारवाई!

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 

Chagan BhujbalDadaji Bhuselead news