सांस्कृतिक कार्यक्रमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वदिनी 'सावित्री उत्सव' केला होता आयोजित.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे डेस्क, दि. २ जानेवारी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वदिनी ‘सावित्री उत्सव’ आयोजित केला होता. ‘प्रथा परंपरांना बदलविणारी बंडखोर सावित्री’, ‘साऊ-स्त्रीमुक्तीचे द्वार’, ‘समाजविवेकी सावित्री’, आदी विचारभावना सवित्रीबाईंबद्दल सभागृहातील पाच महिलांनी फलकावर लिहून कार्यक्रमाचे उदघाटन केले.

आव्हानात्मक क्षेत्रांत काम करणाऱ्या वैशाली रासकर, (रिक्षाचालक), मेघना सपकाळ (फायर फायटर), पूनम गायकवाड (रिक्षा चालक), रत्नमाला जाधव (पोस्टवूमन), सविता येवलेकर (विद्युत विभाग कर्मचारी), शबनम डफेदार (शिक्षिका व बालरक्षक कार्यकर्त्या) यांचा सत्कार करण्यात आला. या महिलांचे सत्कार महाराष्ट्र अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव फाळके, मंगेश काळे, अक्षय दावडीकर, संदीप गुंजाळ, रुपेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सत्कारार्थी महिला रत्नमाला जाधव, शबनम डफेदार, वैशाली रासकर, सविता येवलेकर, महाराष्ट्र अंनिसच्या पुणे जिल्हा वैज्ञानिक जाणिवा विभागाच्या कार्यवाह अरुणा यशवंते, विक्रीकर निरीक्षक डॉ. आरजू तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले. ‘मी सावित्रीबाई फुले बोलतीये’ हे एकपात्री गौतमी आहेर यांनी सादर केले. ‘कपिलेला मिळाला झोका’ या कथेचे अभिवाचन राम सईदपुरे व गौतमी आहेर यांनी केले. संधी, समन्वय, संवाद आदी मूल्ये रुजविणारे खेळ माधुरी गायकवाड यांनी घेतले.

‘सत्य सर्वांचे आदी घर’, ‘पहिली माझी ओवी ग’, ‘साऊ पेटती मशाल’, ‘स्त्री पुरुष सारे कष्टकरी व्हावे’, ‘काय माय केले सावित्रीने’, ‘समतेच्या वाटेनं…’, ‘गावात आलं नवचं वारं’ ही गाणी अरिहंत अनामिका, महेंद्र वाळुंज, नम्रता ओव्हाळ, राम सईदपुरे, परिक्रमा खोत, मयूर पटारे, माधुरी गायकवाड, प्रणिता वारे यांनी सादर केली. प्रिया आमले, श्रावणी ओंबले, श्रावणी वाळुंज, पूर्वा शिरवळकर, दया दावडीकर यांनी रांगोळी काढली. महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेच्या अध्यक्षा वनिता फाळके यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र अंनिसचे राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी समारोप केला. सुत्रसंचलन रोहिणी जाधव व मयूर पटारे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित घोगरे, सचिन नेलेकर, रविराज थोरात, प्रतीक कालेकर, विनोद खरटमोल, घनश्याम येणगे यांनी प्रयत्न केले.

हे देखील वाचा : 

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

उद्यापासून १५ ते १८ वर्षे वयोगट कोविड लसीकरण शुभारंभ

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड घेणार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनाचा आढावा

 

lead news