लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीजिंग : २०२० मध्ये चीनने संपूर्ण जगाला कोरोन व्हायरस या विषाणू मुळे मृत्युच्या ख्खाईत टाकले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV विषाणूने तिथल्या लोकांमध्ये थैमान घातले आहे. चीनमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भारतातही HMPV विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने भारत सरकारने या विषाणूपासून बचाव करण्यासाठी दक्षता वाढवली आहे आणि लोकांना मास्क घालणे आणि हात धुणे यासारखी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहे.
HMPV हा व्हायरस मागील ६६ वर्षापासून पृथ्वीवर अस्तित्त्वात आहे. जगात अनेक प्रकारचे विषाणू आहेत, त्यापैकी काही सर्वात धोकादायक आहेत तर काही कमी हानिकारक आहेत. सदर विषाणूंचा अभ्यास केल्यानंतर, शास्त्रज्ञ लस तयार करतात जेणेकरुन त्यांचा सामना करता येईल. त्यापैकी काही असे विषाणू आहेत जे हलक्यात घेतले जातात आणि त्यांची लस बनविली जात नाही. 23 वर्षांपूर्वी एक विषाणू होता ज्याला त्यावेळी गांभीर्याने घेतले गेले नव्हते.परंतु हाच विषाणू आता जगभर हाहाकार माजवण्याच्या मार्गावर असून HMPV विषाणूने सध्या चीनमध्ये प्रचंड कहर माजवला आहे.
सध्या चीनमध्ये थंडीचा मौसम सुरु असून HMPV विषाणूने तिथल्या लोकांमध्ये थैमान घातले आहे. लाखो लोकांना याचा फटका बसला असून रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. या विषाणूने चीनच्या अनेक भागात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. भारत सरकारने देखील लोकांना HMPV बद्दल जागरूक केले आहे आणि खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
HMPV हा RNA व्हायरस आहे. या विषाणूमुळे श्वसन संक्रमण होते ज्यामुळे सर्दीसारख्या समस्या उद्भवतात. एचएमपीव्ही विषाणू प्रामुख्याने खोकताना आणि शिंकण्याने निर्माण होणाऱ्या थेंबांद्वारे पसरतो. हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने देखील पसरू शकतो. विषाणूचा संसर्ग कालावधी तीन ते पाच दिवसांचा असून तो हिवाळयातील वसंत ऋतुमध्ये अधिक सक्रिय असतो. सदर विषाणूच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्यात अडचण, सर्दी, खोकला आणि ताप यांचा समावेश आहे.
या व्हायरसचे नवीन स्वरूप कोरोना व्हायरससारखे नाही. वास्तविक HMPV हा विषाणू आधीच अस्तित्वात होता. हा विषाणू 23 वर्षांपूर्वी शोधला गेला होता. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, हा विषाणू पहिल्यांदा 2001 मध्ये ओळखला गेला. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हा विषाणू किमान 1958 पासून पसरत होता. असे असूनही, याकडे कधीही गांभीर्याने पाहिले गेले नाही, ना ती दूर करण्यासाठी लस बनवली गेली, ना त्यावर फारसे संशोधन झाले.
HMPV विषाणूसाठी सध्या कोणतेही लसीकरण उपलब्ध नसून ते सामान्य श्वसन संक्रमणांसारखे मानले जाते. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी श्वसनाच्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मास्क घालणे, हात धुणे आणि संक्रमित लोकांपासून दूर राहणे हे मुख्य उपाय आहेत.
हे ही वाचा,
‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;
प्रत्यक्ष कार्याचे प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम ही काळाची गरज
विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र गडचिरोली येथे “शिक्षकांची पर्यावरण शिक्षण” कार्यशाळा संपन्न