बेकायदेशीर भू सुरुंग स्फोटाने गाव हादरले !

स्वयंपाक घरातील गृहिणी थोडक्यात बचावली....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विशेष म्हणजे या दगडखानीच्या शंभर मीटर पेक्षा कमी अंतरावर जिल्हा परिषद शाळा असून, शाळा व्यवस्थापन समितीने देखील या बाबतची तक्रार केली आहे. मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का ? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

पालघर दि,३ डिसेंबर : पालघर जिल्ह्यातल्या मनोर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या दहिसर ग्रामपंचायत अंतर्गत एका दगड खाणीत केलेल्या स्फोटामुळे एका घराचे मोठे नुकसान झाले आहे. दहिसर येथील डेवणी पाडा येथील दगड खाणीमध्ये केलेल्या अवैध भू सुरुंग स्फोटामुळे उडालेले दगड थेट एका आदिवासी बांधवांच्या स्वयंपाक घरात पडल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी घरातील गृहिणी थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टाळला आहे.

मनोर पोलिस स्टेशन हद्दीतील दहिसर ग्रामपंचायत अंतर्गत डेवणी पाडा येथील रोहित नोक्ती यांच्या घरावर हा दगड पडला आहे. या दुर्घटनेत घराचा पत्रा फुटून दगड थेट स्वयंपाक घरात पडला, यावेळी स्वयंपाक घरत असलेली गृहिणी थोडक्यात बचावली. सदर दगडखान ही खाणीत बेकायदेशीरपणे भू सुरुंगस्पोट होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून या विरोधात अनेक वेळा तक्रारी करून देखील दगड खाणीवर महसूल विभागाकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे या दगडखानीच्या शंभर मीटर पेक्षा कमी अंतरावर जिल्हा परिषद शाळा असून, शाळा व्यवस्थापन समितीने देखील याबाबतची तक्रार केली आहे. मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का ? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. ही दगड खाण तातडीने बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी पालघरपोलीस अधीक्षक पालघरमनोर पोलिस स्टेशन