लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सांगली, दि. १० फेब्रुवारी : कर्नाटक राज्यातील उडपी मध्ये मुस्लिम समाजातील कॉलेजच्या विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावरून मोठा वाद उफाळला आहे. यात हिंदुत्ववादी संघटना उतरल्याने त्याला वेगळे वळण लागले आहे. हिजाब घालण्यास विरोध करणाऱ्या स्थानिक भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या गावगुंड कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी, कर्नाटकात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची दोनवेळा विटंबना झाली, टिपू सुलतान यांच्या विषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली.
त्यामुळे कर्नाटक सरकार हे राज्यात जातीय सलोखा राखण्यास अपयशी ठरल्याने सरकार बरखास्त करून त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी एमआयएम पक्षाच्यावतीने राष्ट्रपतींना करण्यात आली. याबाबतचे निवेदन सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले. यावेळी एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा :