राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. २२ जानेवारी : वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

या निर्णयानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नव्याने वाढविण्यात आलेली महाविद्यालय निहाय प्रवेश क्षमता याप्रमाणे आहे.

मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व नायर चॅरीटेबल रुग्णालयात डी.एम. (D.M. Nephrology) या विषयाकरिता विद्यार्थी प्रवेश क्षमतावाढ 1 वरुन 3 करण्यात आली आहे. तर यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी. (MD Anesthesiology) या विषयात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता 4 असणार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे एम.डी. (MD General Medicine) आणि एम.एस. (जनरल सर्जरी) या दोन विषयातील अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत अनुक्रमे 3 वरुन 6 आणि 3 वरुन 5 इतकी वाढ करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D. Microbiology), (M.D. Pathology), (M.D. Pharmacology), (M.D. Respiratory Medicine) या चार अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 3, 4,3 आणि 2 इतकी विद्याथी प्रवेश क्षमता नव्याने करण्यात आली आहे.याशिवाय याच वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D. Anaesthesiology), (M.D. Otorhinolarynegology), (M.D. General Medicine), (M.S. General Surgery), (M.S.Obstetrics & Gynaecology), (M.D. BioChemistry), आणि (M.S. Opthalmology), या 7 अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 4.3.9.3.3.4 आणि 2 इतकी विद्याथी प्रवेश क्षमता वाढ करण्यात आली आहे.

एम.डी (M.D. Radio- diagnosis) आणि (M.D. Paeduatrics) या 2 विषयात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील प्रवेश क्षमतेत अनुक्रमे 5 वरुन 6 आणि 4 वरुन 6 इतकी वाढ करण्यात आली आहे.

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D. Darmatology, Venereology & Leprosy) या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली असून येथील विद्यार्थी प्रवेश क्षमता 3 असणार आहे.

पुण्यातील बे.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D Emergency Medicine), हा अभ्यासक्रम 3 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे देखील वाढ : 

महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठवला प्रस्ताव – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

वाघाची शिकार करणाऱ्या ६ आरोपींवर गुन्ह्याची नोंंद : वनविभागाची कठोर कारवाई

सराफा व्यापाऱ्यावर पाेलिस कोठडीत ‘अनैसर्गिक लैंगिक’ अत्याचार…

 

Amit Deshmukhlead news