केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे.
कोरोना व्हायरसवरील दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 09 जानेवारी:- कोरोना व्हायरसवरील दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार याबाबत देशभरात चर्चा सुरु होती. येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची रंगीत तालीम देशभर सुरु होती. दोन टप्प्यात ड्राय रन घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होत आहे.
कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल.
यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीरमनं उत्पादीत केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्स या दोन लसींचं लसीकरण करण्यात येणार आहे.
कोविड 19 लसीकरणाबाबत राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला कॅबिनेट सचिव व आरोग्य सचिवांखेरीज इतर अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीनंतर लसीकरणाची तारीख निश्चित करण्यात आली.